कोरोनाचा वाढता कहर
कोरोनाचा वाढता कहर

कल्याण : कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) महानगरपालिका क्षेत्रात कोरोना(corona) मृतांची संख्या ६०० पार झाली असून आज नव्या २४४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच ९ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३९१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या २४४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २७,९२८ झाली आहे. यामध्ये ३१८७ रुग्ण उपचार घेत असून २४,१४० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत ६०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजच्या २४४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व – ४५, कल्याण पश्चिम- ७४, डोंबिवली पूर्व- ७७, डोंबिवली पश्चिम- २४, मांडा टिटवाळा २०, मोहना येथील ४ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ८७ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १० रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ७ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, १ रुग्ण हॉलीक्रॉस रुग्णालयातून, ७ रुग्ण पाटीदार कोव्हिड केअर सेंटरमधून, १ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, ४ रुग्ण आसरा फाऊंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.