corona patients

वाढत्या रुग्णसंख्येबराेबर मृत्युची संख्याही राज्यात राेज वाढत आहे.(corona deaths in maharashtra) राज्यात दरराेज १०० पेक्षा अधिक रुग्णांचा काेराेनाने मृत्यु हाेत आहेत. ही आकडेवारी पाहता, राज्यात प्रत्येकी एका तासाला ५ रुग्णांचा मृत्यु हाेत असल्याचे समाेर येत आहे.

  नीता परब, मुंबई: महाराष्ट्रात काेराेनाची दुसरी लाट(corona second wave) आता उंबरठ्यावर आहे. परिणामी, राज्य आराेग्य विभागाची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आतापर्यंत काेराेनाच्या नवीन रुग्णांची संख्या ४० हजाराच्या पार गेली आहे. वाढत्या रुग्णसंख्येबराेबर मृत्युची संख्याही राज्यात राेज वाढत आहे. राज्यात दरराेज १०० पेक्षा अधिक रुग्णांचा काेराेनाने मृत्यु हाेत आहेत. ही आकडेवारी पाहता, राज्यात प्रत्येकी एका तासाला ५ रुग्णांचा मृत्यु हाेत असल्याचे समाेर येत आहे. वाढती मृत्युची आकडेवारी लक्षात घेता, महाराष्ट्र राज्यात हाेणारे मृत्यु हे देशात हाेणाऱ्या मृत्युपेक्षा अधिक आहेत. सध्या राज्यात मृत्यु दर २ टक्के आहे तर देशात मृत्यु दर १.३४ टक्के आहे.

  काेविड टास्क फाेर्स सदस्यांची मुख्यंमत्र्यांसाेबत बैठक

  महाराष्ट्र राज्यात काेराेनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञ डाॅक्टरांनी व्यक्त केली आहे. दिवसेंदिवस राज्यात काेराेनाचे रुग्ण वाढत आहेत. संसर्गाची ही साखळी ताेडण्यासाठी राज्य आराेग्य विभाग नानाविध प्रयत्न करत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नुकतीच काेविड टास्क फाेर्स सदस्यांची एक बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाेबत झाली. या बैठकीत येत्या काही दिवसात वाढत्या रुग्णसंख्येबराेबर काेविडमुळे हाेणाऱ्या मृत्यूची ही संख्या वाढणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

  मागील आठवड्याभरात ८८१ रुग्णांचा काेराेनाने मृत्यू

  मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात काेराेनामुळे हाेणाऱ्या दरराेजच्या मृत्युचा आकडा १०० पार केली आहे. मागील ८ दिवसात ८८१ रुग्णांचा काेराेनाने मृत्यु झाला आहे. ही मृत्युसंख्या पाहता प्रत्येक तासाला ५ रुग्णांचा मृत्यु हाेत आहे. वाढती मृत्युसंख्या रेाखण्यासाठी आराेग्य विभाग सध्या शर्थीचे प्रयत्न करत आहे.

  देशापेक्षा राज्याचा मृत्यूदर नेहमीच अधिक !

  काेविड टास्क फाेर्सचे सदस्य डाॅ.राहुल पंडित यांनी सांगितले की, ‘मागील आठवड्याभरात काेराेना संक्रमित क्रिटीकल रुग्ण रुग्णाालयात दाखल हाेत आहेत. ज्यामुळे येत्या काही दिवसात काेराेनामुळे हाेणाऱ्या मृत्युची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मृत्युची संख्या वाढल्यास मृत्युदर वाढू शकताे. सध्या जेवढे नवीन रुग्ण आढळून येत आहेत हे पाहता मृत्यूदर हा पूर्वीप्रमाणेच आहे. दरराेज सापडत असलेले रुग्ण व मृत्युसंख्या पाहता मृत्यूदर एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. तर देशात हाेणाऱ्या काेराेना मृत्युदरापेक्षा महाराष्ट्र राज्यात हाेणारे मृत्यू हे यापुर्वी पासून अधिकच आहेत. नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन करु नये,असे आवाहन करण्यात आले आहे.

  मृत्युदर समान राहील

  कोराेना मृत्यु निरीक्षण समितीचे सदस्य डाॅ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, ‘रुग्णसंख्या ज्या-ज्या पध्दतीने वाढत जाईल, त्या प्रमाणे मृत्युचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे. तसेच वाढत्या रुग्णसंख्येबराेबर मृत्यु दरही स्थिर राहील . कमी रुग्ण आढळून येत हाेते तेव्हा मृत्यूसंख्या कमी हाेती. अाता अधिक रुग्ण सापडत आहेत तर मृत्युची संख्या वाढत आहे पण मृत्यूदर समान राहील.