corona

मुंबई :आज राज्यात कोरोनामुळे(corona) होणारे मृत्यू घटल्याची नोंद झाली. आज राज्यात १४,३४८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४,३०,८६१ झाली आहे. आज १६,८३५रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण ११,३४,५५५ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.३ % एवढे झाले आहे. तर राज्यात आज रोजी एकूण २,५८,१०८ ऍक्टिव्ह रुग्ण असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान आज २७८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ % एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण २७८ मृत्यूंपैकी १५१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ६३ मृत्यू पैकी ठाणे १४, सातारा १३, नागपूर ११ पुणे ८, नाशिक ४, जळगाव जालना कोल्हापूर सांगली प्रत्येकी २ तर वर्धा, सोलापूर, मुंबई, रायगड आणि चंद्रपूर प्रत्येकी १ असे आहेत. तसेच आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७०,३५,२९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४,३०,८६१ (२०.३४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२,०३,९६६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,४१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.