कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या २० हजार पार

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या २० हजार पार झाली असून आज ३०३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ११ जणांचा मृत्यू झाला असून ४१७ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ३०३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २०,२७० झाली आहे. यामध्ये ५६४५ रुग्ण उपचार घेत असून १४,२५७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ३६८  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३०३ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व -६९,  कल्याण पश्चिम-७८,  डोंबिवली पूर्व -५८,  डोंबिवली पश्चिम-६७,  मांडा टिटवाळा ७,  तर मोहना येथील २४ रूग्णांचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १५९ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून,  २० रुग्ण ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ७ रुग्ण बाज आर. आर. रूग्णालयामधून तसेच ६ रुग्ण होलीक्रॉस रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.