कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या २५ हजार पार

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येने २५ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या ३६१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून ४२७ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ३६१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २५,२३१ झाली आहे. यामध्ये ३१९२ रुग्ण उपचार घेत असून २१,५१९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत ५२० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजच्या ३६१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व – ४८,  कल्याण पश्चिम- ८३,  डोंबिवली पूर्व-१६६, डोंबिवली प श्चिम- ५०, मांडा टिटवाळा -७, मोहना -४, तर पिसवली येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ९७ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १० रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ११ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ३ रुग्ण होलीक्रॉस रुग्णालयातून, २३ रुग्ण पाटीदार कोव्हिड केअर सेंटरमधून, ५ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, ५ रुग्ण आसरा फाऊंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.