corona virus

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येने २१ हजारांचा टप्पा पार केला आहे. आज १५४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून ४९३ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या १५४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २१,०६१  झाली आहे. यामध्ये ५०६८ रुग्ण उपचार घेत असून १५,५९८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ३९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १५४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व -३९,  कल्याण प.-४०,  डोंबिवली पूर्व -४३,  डोंबिवली प-२२,  मांडा टिटवाळा ४,  तर मोहना येथील ६ रुग्णांचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १५८ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून,  १५ रुग्ण  ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, १० रुग्ण बाज आर. आर. रूग्णालयामधून तसेच ७ रुग्ण होलीक्रॉस रुग्णालयातून, तर ४ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झालेले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत. दरम्यान आज रुग्णसंख्या कमी असल्याने कल्याण डोंबिवलीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.