कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला २८ हजारांचा टप्पा

कल्याण : कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) महानगरपालिका क्षेत्रात कोरोना(corona) रुग्णसंख्येने २८ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या ३४६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३१३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ३४६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २८,२७४ झाली आहे. यामध्ये ३२१२ रुग्ण उपचार घेत असून २४,४५३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ६०९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजच्या ३४६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व – ४९, कल्याण प.- १०७, डोंबिवली पूर्व ११०, डोंबिवली प- ६९, मांडा टिटवाळा येथील ११ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ९५ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, २२ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ४ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ४ रुग्ण होलीक्रॉस रुग्णालयातून, १३ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ३ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, ४ रुग्ण आसरा फाऊंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.