क्रेडाई महाडकडून बिल्डिंग दुर्घटनेचा निषेध

महाड: महाडच्या काजळपुरा भागात आज ५ मजली बिल्डिंग कोसळली आहे. या बिल्डिंगमध्ये २०० ते २५० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही इमारत हलत असल्याची तक्रार करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बिल्डर्सवर त्वरीत गुन्हा दाखल करण्याची मागणी या घटनेनंतर केली जात आहे. आज सांयकाळी या इमारतीमधून काही हलण्याचा आवाज येवू लागताच ४० कुटुंबापैकी २५ कुटुंबियांना बाहेर पडण्यात यश आले . तर पंधरा कुटुंबीय या कोसळलेल्या इमारतीच्या ढीगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.  या घटनेनंतर महाड क्रेडाईचे अध्यक्ष प्रशांत गुजर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गुजर यांनी म्हटले आहे की, घडलेली ही घटना अतिशय  दुर्दैवी आहे. या बिल्डिंगचा डेव्हलपर क्रेडाई महाडचा सदस्य नाही. या बिल्डिंगचे टेक्निकल तपासून बघायला लागतील. क्रेडाई महाड या घटनेचा निषेध करते.