भिवंडीत अवैध विदेशी दारू विक्रेत्यावर गुन्हा

काल्हेर येथील परेश कॉम्प्लेक्समधील गाळा क्र.१५ ह्या सॅनिटायझर, मास्क,पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स विक्रीच्या दुकानात विनापरवाना विदेशी दारू विक्री करीत असल्याचे आढळून आल्याने दुकानदारास नारपोली पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर नारपोली पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.

भिवंडी : काल्हेर येथील परेश कॉम्प्लेक्समधील गाळा क्र.१५ ह्या सॅनिटायझर, मास्क,पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स विक्रीच्या दुकानात विनापरवाना विदेशी दारू विक्री करीत असल्याचे आढळून आल्याने दुकानदारास नारपोली पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर नारपोली पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. अमृत ताराराम जालोरा (२५) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ३,१९० रुपये किंमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.या घटनेचा पुढील तपास नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रणजित वाळके करीत आहेत.