University-Exam

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत २३ सप्टेंबरला संपली आहे. मात्र विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रवेश प्रक्रियेस(entrance process) ६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ(date extended देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत प्रवेश घेणे शक्य न झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी पदवी स्तरावरील द्वितीय व तृतीय वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी आयटी व बीएस्सी कॉम्पुटर सायन्स  या अभ्यासक्रमासाठी व पदव्युत्तर  भाग २ एमए, एमए – शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएससी, एमसीए, पदव्युत्तर एक वर्षाचे व्यवस्थापन पदविका, पीजी डीएफएम पीजी डीओआरएम या अभ्यासक्रमाचे ऑनलाईन प्रवेश ८ सप्टेंबरपासून सुरु झाले असून बुधवारी २३ सप्टेंबर रोजी याची मुदत संपली होती. मात्र अनेक विद्यार्थ्यांनी विविध कारणांमुळे प्रवेश घेतले नसल्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होती त्यानुसार ६ ऑक्टोबर पर्यन्त विद्यार्थ्यांना आयडॉलच्या विविध अभ्यासक्रमसाठी प्रवेश घेता येणार आहे.

मागील वर्षी आयडॉलमध्ये ६७,२३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यामध्ये २६,१७१ विद्यार्थी होते, तर ४१,०६६ विद्यार्थिनी होत्या. विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनीची संख्या सर्वाधिक होती. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी ठाणे, कल्याण व रत्नागिरी या विद्यापीठाच्या उपकेंद्रावर आयडॉलच्या विद्यार्थ्यांना अध्ययन साहित्याचे वितरण केले जाते. तसेच त्यांना मार्गदर्शनही केले जाते. आयडॉलच्या प्रवेशाची सर्व अद्ययावत माहिती विद्यापीठाचे  संकेतस्थळ, आयडॉलचे फेसबुक पेज व ट्विटरवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी  info@idol.mu.ac.in हा ईमेल उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.