विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी – शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज करण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ, महाडीबीटी पोर्टलवरून करता येणार ऑनलाईन प्रक्रिया

विद्यार्थ्यांना दिलासा म्हणून शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत(date extended for scholarship of college student) ३० मे २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

  मुंबई : राज्यातील महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध १४ शिष्यवृत्ती योजना(scholarship scheme) राबविण्यात येत आहे. या शिष्यवृत्ती योजनेला अर्ज करण्याची मुदत ३० एप्रिल रोजी संपली होती. मात्र अद्यापही कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज केले नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा म्हणून शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३० मे २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

  विद्यार्थ्यांनी ३० मे २०२१ पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर जाऊन शिष्यवृत्तीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांची ऑनलाईन पद्धतीने अंमलबजावणी करणेसाठी माहिती तंत्रज्ञान विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडून महाडीबीटी पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे.

  यामध्ये उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या १४ शिष्यवृत्ती योजनाचा समावेश आहे. या शिष्यवृत्ती योजनेला विद्यार्थ्यानाकडून कमी प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती आकडेवारीनुसार कळाली. त्यामुळे या विविध १४ शिष्यवृत्ती योजनेचा विद्यार्थ्यांना लाभ मिळावा म्हणून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी कॉप्स विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष अमर एकाड यांनी उच्च शिक्षण विभागाकडे केली होती.

  कोरोना महामारी आणि विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनांची माहिती नसल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज केले नसल्याची माहिती उच्च शिक्षण संचलनालयला मिळाली.

  लाखो विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता पात्र असूनही अद्याप अर्ज केलेले नाहीत. अनेक महाविद्यालयांनी राज्य शासनाच्या विविध विभागाच्या शिष्यवृत्ती योजनाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली नाही. अनेक विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या विविध विभागाच्या शिष्यवृत्ती योजनाची माहिती व महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा भरावा ? हे देखील माहित नाही. त्यामुळे महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची मुदत ३१ मे, २०२१ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती उच्च शिक्षण संचलनालयाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.