नानासाहेब टोणगावकर यांचे निधन

दोंडाईचा: दोंडाईचा येथील धन्वंतरी, अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ पुढे नेणारे विवेकवादी, गरिबांचे डाॅक्टर, गांधी विचारांचे पाईक  डाॅ. नानासाहेब रवींद्र टोणगावकर यांचे आज दुपारी नाशिक येथे कोरोनावर उपचार सुरू असताना निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.

त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील कर्तबगार शल्य चिकित्सक निघून गेला आहे, शिंदखेडे तालुक्यातील घराघरात त्यांच्या बद्दल जिव्हाळा होता. अण्णासाहेब टोणगावकर आणि माई टोणगावकर यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात योगदान दिले होते,गांधीजींची जीवनशैली अंगिकारून आपले जीवन त्यांनी समाजासाठी समर्पित केले. त्या आई वडलांचा वैचारिक व कृतिशील वारसा नानासाहेब टोणगावकर करांनी आयुष्यभर जपला. विधायक कामासाठी त्यांच्याकडे गेलेला कुणीही रित्या हाताने परत गेला नाही. पैसा नाही म्हणून कोणीही रूग्ण त्यांच्या रूग्णालयातून उपचाराविना परत गेला नाही. ती परंपरा टोणगावकररांची पुढची पिढी चालवित आहे.