death

मुंबई : मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक मृत्यू झाले आहेत. त्यात १ मार्च ते३१ जुलै दरम्याम मुंबईत ४९,०४०  मृत्यूंची नोंद झाली आहे.गेल्या वर्षी याच या दरम्यान ३५,९८२ मृत्यूंची नोंद झाली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी १३,०५८ मृत्यू अधिक झाले आहेत.

सन २०१९ च्या तुलनेत यावर्षी होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत ३७ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ६६६३ मृत्यू अधिक झाले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी मृत्यूचा आकडा वाढला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात ६,८३२ रूग्णांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत यावर्षी हा आकडा वाढला असून यावर्षी १४,०८५ मृत्यू झाले आहेत. तर गेल्या वर्षी जून मध्ये ६,७९७ मृत्यू झाले होते. तर यावर्षी त्यात भर पडली असून मृत्यूचा आकडा ११,५४० वर पोहोचला आहे.
कोरोनाबाधितांची संख्या मे महिन्यात सर्वाधिक होती. याच महिन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद ही झाली आहे. गेल्या१० दशकातील सर्वाधिक मृत्यू मे महिन्यात नोंदवले गेले आहेत. जुन्या मृत्यूंची नोंद अद्याप बाकी असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मार्च महिन्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात ७,३५८ मृत्यू झाले होते तर यावर्षी त्यापेक्षा कमी म्हणजे ६,६९२ मृत्यूंची नोंद झाली आहे. एप्रिल पासून मृत्यूंची संख्या सतत वाढत आहे.एप्रिलमध्ये ७२४३ असणारी मृत्यूंची संख्या मे मध्ये १४,०८५ झाली. जून मध्ये११,५४० तर जुलैमध्ये ९,४८० इतकी मृत्यूंची नोंद झाली.
यावर्षी नोंद झालेल्या मृत्यूंमध्ये कोरोना संसर्ग हे महत्वाचे कारण आहे,त्या तुनलेत रेल्वे किंवा रस्ते अपघातात कमी मृत्यूंची नोंद झाली आहे. यावर्षी केवळ २६० रेल्वे अपघातात मृत्यू झाले आहेत. तर गेल्या वर्षी १ मार्च ते ३१ जुलै च्या दरम्यान १०६८ रेल्वे अपगातातील मृत्यूंची नोंद झाली आहे. जानेवारी ते जुलै दरम्यान१४४ रस्ते अपघातांची नोंद झाली आहे तर गेल्या वर्षी २६४ मृत्यू झाले होते.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी मे आणि जुन महिन्यात अचानक मृत्यू वाढले आहेत. हा आकडा का वाढला हे स्पष्ट झालेले नाही.मात्र कोरोना महामारीमुळे आरोग्य सुविधा वेळेत न मिळाल्याने नॉन कोविड मृत्यू वाढले असण्याची शक्यता असल्याचे पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ मंगला गोमारे यांनी सांगितले.
मुंबई बाहेरील ४० टक्के रूग्णांवर उपचार करण्यात आले.त्यातील काही रूग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा वाढला असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. ठाणे ,नवी मुंबई तसेच पालघरमधील अनेक रूग्णांवर उपचार करण्यात आले असून मृत्यू झालेल्यांचा मृत्यू दाखला ही पालिकेतून देण्यात येत असल्याचे ही काकाणी पुढे म्हणाले.