ajit pawar

न्हावा शेवा टप्पा-३ योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार(ajit pawar) यांनी वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली.

    कोरोनाने(corona) पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊनसदृश्य(lockdown) परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील आठ दिवसात रुग्णसंख्या आणि कोरोना वाढला तर लॉकडाऊनचा निर्णय घेण्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(uddhav thakre) यांनी काल म्हटले होते आता उपमुख्यमंत्र्यांनीही या विषयावर भाष्य केले आहे.

    न्हावा शेवा टप्पा-३ योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार(ajit pawar) यांनी वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली. अजित पवार म्हणाले, “राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढायला लागला आहे. दररोज रुग्णांची वाढतेय. सावध राहायला हवं. मास्क वापरायला हवा. शहरात लॉकडाऊनची वेळ येणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. यवतमाळ, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये काही कठोर निर्णय घ्यावे लागले. पुण्यातही थोडी कडक भूमिका घ्यावी लागली. प्रशासन व राजकीय प्रतिनिधींशी चर्चा करून रात्रीच्या वेळी कडक भूमिका घेण्यात आली आहे.”

    ते पुढे म्हणाले, “ आमचे काही सहकारी आणि मंत्र्यांना कोरोना झाला आहे. संख्या वाढत चालली आहे. एकदा लॉकडाऊन केल्यानंतर संपूर्ण अर्थव्यवस्थेची घडी विस्कटते, हे आपण पाहिलं आहे. दिवसभर काम केल्यानंतर ज्यांची संध्याकाळी चूल पेटते, त्यांची तर एवढी बिकट अवस्था होतेय. कसं जगायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होतो.  कृपा करा, कठोर निर्णय घेण्याची वेळ राज्य सरकारवर येऊ देऊ नका, हेच मला महाराष्ट्रातील जनतेला सांगायचं आहे.”