eknath shinde

एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे की,  काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे(eknath shinde) यांना कोरोनाची(corona) लागण झाली आहे. शिंदे यांनी ट्विट करुन याविषयी माहिती दिली आहे.त्यांची  प्रकृती ठीक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. संपर्कात आलेल्यांना त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहनही केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे की,  काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती…

या ट्विटनंतर  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदेंना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे . तसेच शिंदे लवकर बरे होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाईंनीही ट्विट करत एकनाथ शिंदेंना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.