devendra fadanvis

आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (devendra fadanvis reaction on shifting metro carshade)आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग (metro carshade  to kanjurmarg)येथे हलविण्याचा दुर्दैवी निर्णय हा केवळ अहंकारातून घेण्यात  आल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (devendra fadanvis reaction on shifting metro carshade)आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग (metro carshade  to kanjurmarg)येथे हलविण्याचा दुर्दैवी निर्णय हा केवळ अहंकारातून घेण्यात  आल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.  कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास ४००० कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल, असे याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितले, असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे. आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याच्या  निर्णयावरून ट्विटद्वारे विविध मुद्द्यांना हात घातला आहे. राज्य  सरकारला अनेक प्रश्नही त्यांनी विचारले आहेत.

हा भुर्दंड राज्य सरकार आपल्या अहंकारासाठी कुणाच्या माथी मारू इच्छिते? आणि कशासाठी? असा प्रश्न फडणवीसांनी विचारला आहे. ते पुढे म्हणाले की, कांजूरमार्गच्या जागेचा यापूर्वी सरकारने विचार केला. पण त्यावर मा. उच्च न्यायालयाची स्थगिती होती. काही खाजगी व्यक्तींनी त्या जागेवर दावा सांगितला. स्थगिती मागे घ्यावी, म्हणून विनंती करण्यात आली, तर न्यायालयाने दावे पुढील काळात निकाली निघाले, तर त्यासाठीची रक्कम भरण्यास सांगितले.

फडणवीसांनी  एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ही रक्कम २०१५ मध्ये सुमारे २४०० कोटी रुपयांच्या आसपास होती. आज त्या प्रकरणाची सद्यस्थिती काय? प्रकरण पुन्हा मा. सर्वोच्च न्यायालयात गेले तर विलंबाला जबाबदार कोण? शिवाय कांजूरमार्गची जागा ‘Marshy land‘ असल्याने त्याला स्थिर करण्यासाठी किमान २ वर्षांचा अवधी लागेल.याशिवाय आतापर्यंतच्या सर्व निविदा रद्द कराव्या लागतील आणि नव्याने संपूर्ण प्रक्रिया राबवावी लागेल.या नवीन जागेसाठी डीपीआर किंवा फिजीबिलीटी अहवाल काहीही तयार झालेले नाही. म्हणजे जो मेट्रो प्रकल्प पुढच्यावर्षी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला असता, तो आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे. आरेच्या कारशेडसाठी ४०० कोटी आधीच खर्च झालेले, स्थगितीमुळे १३०० कोटी पाण्यात गेले. शिवाय ४०००० कोटींचा वाढीव भार, असे फडणवीसांनी सांगितले आहे.


कांजूरमार्ग जागेचा वाद कायम राहिल्यास २४००० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल.आज त्यात आणखी किती वाढ होणार? एवढे सारे करून मेट्रो प्रकल्प अनिश्चित काळासाठी लांबणीवर आहे.आपल्या अहंकारासाठी मुंबईकरांच्या प्रवास सुखाला खिळ बसवून सरकार नेमके काय साध्य करू इच्छिते? जनतेची किती मोठी ही दिशाभूल, असा आरोप  फडणवीसांनी केला आहे.