devendra fadnavis

आंदोलकांमध्ये एक समूह असा आहे ज्याला शेतकरी आंदोलनातून मार्ग निघावा, असं वाटत नाही. त्यांच्यामागे कोण आहे हे देखील शोधलं गेलं पाहिजे, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(devendra fadanvis) यांनी व्यक्त केले आहे. 

पंजाब आणि हरयाणामधल्या शेतकऱ्यांनी आंदोलन(farmers protest in delhi) सुरु केलं. या आंदोलनाबाबत मोदी सरकारने चर्चा सुरु केली. ती चर्चा करताना आधी शेतकऱ्यांनी काही सुधारणा सुचवल्या. सरकारने त्या मान्य केल्या. त्यानंतर त्यांनी सरकारकडे लेखी आश्वासन मागितलं. ती मागणीही मान्य झाली. परत एकदा शेतकऱ्यांनी भूमिका बदलली. आता म्हणतायंत की कृषीविषयक कायदेच रद्द करा. याचा अर्थ काय? की आंदोलकांमध्ये एक समूह असा आहे ज्याला शेतकरी आंदोलनातून मार्ग निघावा, असं वाटत नाही. त्यांच्यामागे कोण आहे हे देखील शोधलं गेलं पाहिजे, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(devendra fadanvis) यांनी व्यक्त केले आहे.

देवेंद्र फडणवीस पुढे  म्हणाले की, लोक तिथे कसे गेले हे आपण बघितलं. बिहारचा विचार केला तर तेजस्वी यादव म्हणाले की आमचा या आंदोलनाला पाठिंबा आहे. मात्र बिहारने तर एपीएमसीच रद्द केल्या आहेत. या कायद्यांमध्ये ती तरतूद नाही. तरीपण ते विरोध करत आहेत. आंदोलक चुकीचे आहेत, त्यांचा मार्ग योग्य नाही असं मी अजिबात म्हणत नाही. मात्र काही लोक आहेत ज्यांना वाटतं आहे की हे आंदोलन सुरुच राहावं.