उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे वकिल, राठोडांना एक न्याय मग वाझेंना वेगळा का? फडणवीस आक्रमक

सचिन वाझेंना(sachin wajhe) वकीलांची गरज नाही. त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे(uddhav thakre) वकिली करतायत. तो ओसामा बिन लादेन नाही. पण सरकार तुघलकी आहे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपल्यानंतर आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

    कायदा सुव्यवस्थेच्या एकाही प्रश्नाचे उत्तर सरकारला देता आलेलं नाही. कुठल्याही प्रकरणात कारवाई झालेली नाही, असा आरोप  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला आहे. सचिन वाझेंना वकीलांची गरज नाही. त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे वकिली करतायत. तो ओसामा बिन लादेन नाही. पण सरकार तुघलकी आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपल्यानंतर आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

    सरकार काय माश्या मारणार ?

    वाझेंच्या बाबतीत फडणवीस म्हणाले की, एवढे पुरावे असुनही वाझेंना पाठिशी घातलं जात आहे हे कळत नाही. उद्धव ठाकरे त्यांची वकिली करतायतं. राठोडांच्या बाबतीत एक न्याय आणि वाझेंच्या बाबतीत दुसरा, असं का होत आहे हे कळत नाही. वाझेंचं नाव आल्यानंतरच डेलकर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. डेलकर प्रकरणात कोणत्या भाजपा नेत्यांची नावे आहेत, ही विचारणा केली, त्यावर सरकारकडे उत्तर नाही. सर्व पुरावे विरोधी पक्षनेत्यांनी द्यायचे तर सरकार काय माश्या मारणार का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

    लबाड सरकार

    फडणवीस म्हणाले की, हे अत्यंत लबाड सरकार आहे. वीज तोडण्यांवर स्थगिती द्यायची आणि ती उठवायची यासाठीची कारणं विसंगत आहेत. राज्यातील शेतकरी आणि जनतेला सरकारने शॉक दिला आहे. तसेच ज्या शेतकऱ्याला कर्जमाफी देतो असं सांगितलं. त्यांना माफी दिलेली नाही. सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.  याशिवाय पीक विम्याबाबत चुकीची माहिती सरकारने दिली आहे.ते पुढे म्हणाले की, टेंडर काढणे हे राज्याचे काम , हेक्टरी मदत ठरवणे हे केंद्राचे काम आहे. राज्याने नियम बदलले.त्यामुळे कंपन्यांना फायदा झाला.

    आरक्षण अडचणीत

    आरक्षणाच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, ओबीसी आरक्षणाच्या जागा कमी केल्या. मराठा आरक्षणावर घोळ घातला. दोन्ही आरक्षणे सरकारने अडचणीत आणली आहे. सत्तेचे लचके तोडण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत.
    प्रत्येक प्रकल्पाला शिवसेनेने फक्त विरोध केला आहे. नाणारलाही केला आहे. सेनेने विरोधाला विरोध करु नये. प्रकल्पामुळे फायदा होईल. शेवटी ते म्हणाले की, राहुल गांधींच्या वक्तव्यांना जसे महत्व दिले जात नाही, तसेच नाना पटोलेंच्या वक्तव्यांकडे दिले जात नाही.

    आंदोलन

    वीजबिलाच्या बाबतीत जो अन्याय झाला आहे त्याविरोधात आंदोलन करणार आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्याच्या बाबतीत जो अन्याय झाला आहे त्याविरोधातही आंदोलन करणार असल्याचही फडणवीस यांनी सांगितलं.