राज्यात १४,१६१ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई : राज्यात १४,१६१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६,५७,४५० झाली आहे. राज्यात १,६४,५६२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३३९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या २१ ६९८ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३०% एवढा आहे.

राज्यात ३२६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४२, ठाणे १७, नवी मुंबई मनपा ११, कल्याण डोंबिवली मनपा ७, वसई विरार मनपा५, पालघर ११, नाशिक १६, पुणे ६३, पिंपरी चिंचवड मनपा १८, सोलापूर ८, सातारा १३, कोल्हापूर २०, सांगली १२, नागपूर १७ आणि अन्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ३३९ मृत्यूंपैकी २६० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३१ मृत्यू पुणे १०, ठाणे ९, नाशिक ३, अहमदनगर २, कोल्हापूर २, नंदुरबार १, सांगली १, सातारा १, सोलापूर १ आणि पालघर १ असे आहेत. आज ११,७४९ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ४,७०,८७३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.६२ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३४,९२,९६६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६,५७,४५० (१८.८२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११,९२,६८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५,१३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.