dilip Ghosh

पश्चिम बंगालमधील(west bengal election) विधानसभा निवडणुकांपूर्वी आरोप - प्रत्यारोपांना धार चढली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष(dilip ghosh) यांनी पुन्हा एकदा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(mamata banerjee) यांच्यासह अमर्त्य सेन(amartya sen) यांच्यावरही निशाणा साधला.

कोलकाता: पश्चिम बंगालमधील(west bengal election) विधानसभा निवडणुकांपूर्वी आरोप – प्रत्यारोपांना धार चढली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष(dilip ghosh) यांनी पुन्हा एकदा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(mamata banerjee) यांच्यासह अमर्त्य सेन(amartya sen) यांच्यावरही निशाणा साधला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बंगालला स्वत:ची खासगी मालमत्ता समजतात अशी टीका केली. यासोबतच सेन यांनी लव्ह जिहाद विरोधी कायद्यावर केलेल्या टीप्पणीवर घोष यांनी पलटवार केला. अमर्त्य सेन यांच्या खासगी जीवनावर भाष्य करण्याची इच्छा नसून त्यांनी स्वत:च तीन विवाह केले आणि वेगवेगळ्या धर्मात केले त्यामुळे त्यांनी यावर टीप्पणी करू नये असा सल्लाही दिला.

भूखंड वाटपात मनमानी
बंगालवह जेव्हाही संकट ओढवले होते तेव्हा अमर्त्य सेन यांनी देशातून पळ काढला होता. यावेळी त्यांनी अमर्त्य सेन यांच्याशी संबंधित भूखंड वादावरही निशाणा साधला. दोन्ही पक्ष एकमेकांची मदत करण्यात व्यस्त आहेत असे ते म्हणाले. विश्व भारती विद्यापीठाच्या मुद्यावरून ममता सरकारला घेरताना ममता बॅनर्जी बंगालला आपली मालमत्ता समजतात असे ते म्हणाले. मनात येईल त्याला त्या भूखंड वाटप करीत आहेत असा आरोपही घोष यांनी केला. विश्वभारती विद्यापीठातील माफियाराज त्यांना मोडून काढता येत नाही असा आरोपही त्यांनी केला. शैक्षणिक संस्थांनी राजकारणापासून दूरच राहायला हवे असे मतही घोष यांनी व्यक्त केले.

आयपीएस स्थानांतरण मुद्द्यावरही भाष्य
आयपीएस स्थानांतरण प्रकरणावर भाष्य करताना हा मुद्दा केंद्र आणि राज्यातील असल्याचे घोष म्हणाले. एखाद्या अधिकाऱ्यास जर केंद्राने परत बोलावले तर त्यांना आज ना उद्या जावेच लागेल असे ते म्हणाले. तथापि, राज्य सरकारला जर वाटत असेल की आपण त्यांचा बचाव करू तर मात्र ते चुकीचे ठरेल असेही घोष म्हणाले. उल्लेखनीय असे की अमर्त्य सेन यांच्यावर विश्वभारती विद्यापीठाच्या जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. मात्र या वादाच्या पार्श्वभूमीवर ममतांनी त्यांना पाठिंबा दर्शविला आहे.

सौरवसारखे व्यक्ती राजकारणात हवे
बीसीसीआय अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांच्यासोबत चर्चा केली होती. तथापि ही एक सामान्य भेट होती असे स्पष्टीकरण देण्यात आले होते. आता बंगाल प्रदेशाध्यक्षांनी यावर भाष्य केले आहे. सौरवसारख्या यशस्वी व्यक्तीने राजकारणात यायला हवे असे ते म्हणाले. सौरवकडे राज्यपालांची भेट घेण्याचे अधिकार आहे. ते भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासारख्या यशस्वी व्यक्तीने राजकारणात यायलाच हवे असे ते म्हणाले.