Knife-attack

सध्याची परिस्थिती पाहता नोकरी मिळवण्यासाठी इच्छूक उमेदवार काहीही करतात. नोकरी मिळवण्याच्या ताणामुळे तरुणांच्या दोन गटांमध्ये चाकूनं मारामारी(dispute over job) झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

नवी दिल्ली : सध्याची परिस्थिती पाहता नोकरी मिळवण्यासाठी इच्छूक उमेदवार काहीही करतात. नोकरी मिळवण्याच्या ताणामुळे तरुणांच्या दोन गटांमध्ये चाकूनं मारामारी(dispute over job) झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. दोन गटांनी एकमेकांवर चाकूनं तब्बल ३९ वार(knife attack) केले. या प्रकरणात एका तरुणाचा मृत्यू झाला. दोन जण जखमी झाले आहेत. दिल्लीच्या सफदरजंग भागामध्ये ही घटना घडली आहे.

या मारामारीच्या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अटक केलेेल्यांपैकी एक अल्पवयीन आहे. सफदरजंग हॉस्पिटलमध्ये  कंत्राटी पद्धतीवर नोकरी करण्याच्या मुद्यांवर तरुणांच्या दोन गटांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर या वादावादीचं रुपांतर आधी मारामारी आणि नंतर चाकू हल्ल्यामध्ये झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

नीरज आणि मुकेश हे दोन तरुण  सफदरजंग हॉस्पिटलमध्ये एका कंपनीच्या मार्फत कंत्राटी कामगार होते. कृष्णा, रवी आणि त्यांच्या मित्रांनाही हॉस्पिलमध्ये काम करण्याची इच्छा होती. मात्र, त्यांच्या नोकरीचं काम काही होत नव्हतं. हे सर्व तरुण दोन दिवसांपूर्वी रात्री पार्टी करत होते. त्यावेळी नोकरी करण्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यात वादावादी सुरु झाली. या भांडणाच्या दरम्यान कृष्णानं चाकूनं हल्ला केला. या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले. त्यानंतर कृष्णा फरार झाला. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. हॉस्पिटलमधील उपचाराच्या दरम्यान नीरजचा मृत्यू झाला.

या प्रकरणातला मुख्य आरोपी कृष्णाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर रवी आणि आणखी एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. या सर्व आरोपींवर हत्या करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.