राम मंदिर बांधून कोरोना जाईल अस वाटतंय का ?  शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका

अयोध्येतील  ऐतिहासिक राम मंदिराचे  भूमीपूजन  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी केलं जाणार आहे. याबाबतचे राम मंदिर ट्रस्टचे निमंत्रण पंतप्रधानांनी स्विकारलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “ काहीजणांना राम  मंदिर बांधून कोरोना जाईल अस वाटतंय का ? जर तसे असेल तर भूमिपूजन अवश्य करा फक्त कोरोनाचे संकट दूर व्हावे हीच आमची इच्छा आहे.” अशा शब्दात पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टीका केली  आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार  सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी करोना संकटाच्या मुद्यावर मोदी सरकारला चिमटे काढले. यावेळी  पालकमंत्री दत्तात्रय भरणे  व आरोग्यमंत्री राजेश टोपे हे उपस्थित होते.

कोरोनाचे संकट देशात वाढत आहे. तसेच लॉकडाऊनमुळे  आर्थिक नुकसान होत आहे.याकडे केंद्र व राज्य सरकारने लक्ष द्यायला हवे तसेच योग्य समन्वय  साधत या संकटावर मात करायला हवे. मात्र काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल  अस वाटत आहे तर भूमिपूजन अवश्य कराअशा शब्दांत शरद पवार यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.कोरोना सारख्या महासंकटात कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे, हे प्राधान्याने ठरविले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.