sanjay raut-kangana

महाराष्ट्र राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राविषयी बोलताना भान ठेवून बोलणे आवश्यक आहे. कंगना राणावतसोबत(kangna ranawat) माझे व्यक्तिगत भांडण नाही. मात्र महाराष्ट्राचा, मुंबईचा अपमान(insult) सहन केला जाणार नाही. मुंबईला(mumbai) पाकव्याप्त काश्मीर म्हणण्याचे कृत्य गंभीर आहे, असे खासदार संजय राऊत(sanjay raut) यांनी म्हटले आहे. ते मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

आशिष शेलारांच्या वक्तव्याविषयी राऊत म्हणाले की, कंगनाने मुंबईला अक्कल शिकवण्याची गरज नाही, असे आशिष शेलार म्हणाले. त्यांनी हे जास्त जोरात म्हटले पाहीजे. महाराष्ट्र त्यांचाही आहे.महाराष्ट्रात तेदेखील राजकारण करतात. छत्रपती शिवाजी महाराजही कोणा एकट्याचे नाहीत. ते महाराष्ट्राचे, संपूर्ण देशाचे आहेत.  शिवरायांच्या महाराष्ट्रावर कोणी अशी टीका करत असेल तर तो फक्त शिवसेनेचा किंवा एखाद्या पक्षाचा विषय नाही तो राज्यातील ११ कोटी जनतेचा विषय आहे. बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी कंगनाला यावरून सुनावले, त्याबद्दल त्यांचे राऊत यांनी अभिनंदन केले.

शुक्रवारी सर्वपक्षियांनी आंदोलन केले. गृहमंत्र्यांनीही कंगनाला सुनावले. परिवहन मंत्री अनिल परबही काल बोलले. जे काही सांगायचे आहे ती सरकारची भूमिका आहे. मी देखील पक्षाच्या वतीने बोलायला हवे ते बोललो. आता हा विषय संपवायला हवा. जे काही करायला पाहीजे ते सरकार करेल, असे राऊत म्हणाले.