drug network

हिरेजडित दागिन्यांचा असलेला शौक, कोट्यवधींचा बंगला असलेल्या एका महिलेला इंदूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रिती जैन ऊर्फ काजल ऊर्फ सपना असे या महिलेचे नाव असून ड्रग्जचा पुरवठा केल्यावरून तिला पोलिसांनी जेरबंद केले.(drugswali aunty arrest in Indore)

इंदूर : हिरेजडित दागिन्यांचा असलेला शौक, कोट्यवधींचा बंगला असलेल्या एका महिलेला इंदूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रिती जैन ऊर्फ काजल ऊर्फ सपना असे या महिलेचे नाव असून ड्रग्जचा पुरवठा केल्यावरून तिला पोलिसांनी जेरबंद केले.(drugswali aunty arrest in Indore) प्रिती जैनचा पुण्याशी निकटचा संबध आहे. आंटी म्हणूनच ती प्रसिद्ध आहे. तिने शहरातील अनेक पब, रेस्टॉरंट, कॅफे, पूल क्लब आणि जिममध्ये ड्रग्जचा पुरवठा केल्याचे कबूल केले. या महिलेचे गोवा आणि मुंबईतही नेटवर्क असल्याचे समजते.

पोलिसांसमोर दाखविला रुबाब
ज्यावेळी पोलिसांनी या महिलेला अटक केली तेव्हा तिने इंग्रजी भाषेत हुज्जत घातली. हात लावायची हिंमतच कशी झाली असा सवालही तिने पोलिस अधिकाऱ्यांना केला. एवढेच नव्हे तर या महिलेला सोडविण्यासाठी तीन युवतीही पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. या युवती प्रितीच्या ग्राहक असल्याचे समजते. दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी एका ड्रग्ज पेडलरला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीवरूनच पोलिसांनी ही कारवाई केली. या महिलेने आजवर अनेक बिल्डरस, व्यवसायी आणि पब संचालकांना नशेची सवय लावली आहे. जवळपास १० लाख रुपयांचे ड्रग्ज ती महिन्याला विकते अशी चर्चा आहे.

सर्व व्यवहारात कोडवर्ड

ग्राहक आणि पेडलरमध्ये कोडवर्डच्या माध्यमातूनच देवाण घेवाण व्हायची असे तीने पोलिसांना सांगितले. चॉकलेट, रिया, माल, म्याऊं, मम्मीसारखे कोडवर्ड एमडीएमसाठी होते. मोठे आणि मालदार युवक व युवती तिला थेट कॉल करून ड्रग्ज घेऊन जात असत.
अनेक मोठ्या पब्सवर तिची नजर असायची आणि पार्किंगमध्ये तिचे पेडलर फिरत असत व त्यांच्या माध्यमातूनच ती ड्रग्जचा पुरवठा करीत असे.