पावसाअभावी पालघरमधील भात लागवड अडचणीत

वाडा: पालघर जिल्ह्यात पावसाअभावी भात लागवड अडचणीत आली आहे. मान्सूनचा पाऊस हा या भागात कमी होत आहे. त्यामुळे येथील शेतकरी वर्गाने लागवडीकरिता चक्क ओढा आणि नाल्यातून घरगुती वापरात असलेल्या हंडा, बादलीतून भातशेतीला पाणी दिले जात आहे. या पाण्यातून पाण्याअभावी शुष्क झालेल्या शेतजमिनीत भात लागवड करताना शेतकरी दिसत आहे. दुसरीकडे शेतकऱ्याने पावसाने दडी मारल्यामुळे भातशेती लागवड करणे सोडून दिली आहे. पावसाअभावी दोन एकर जमीन लावणे सोडून दिले. तयार झालेली भात रोप ही आता शेतजमिनीतून काढता येत नाही. तयार झालेले रोप शेतजमिनीत लावता येत नाही. अशा द्विधा मनस्थितीत सापडला आहे. पावसाअभावी शेतकरी वर्गाची भात शेती अडचणीत आल्याने शासनाने दुष्काळ जाहीर करावा, सोसायटी माफ करावी , शासनाने मदत करावी अशा मागण्या शेतकरी करीत आहेत.

पालघर जिल्ह्यात सध्या ऊन पावसाचा खेळ चालू आहे.हवामान खात्याने जरी मुसळधार पाऊस होत असल्याचा अंदाज व्यक्त केला असला तरी इथल्या भात शेतीला अजुन पाणी नाही. भात लागवडीसाठी मुबलक पावसाची अपेक्षा अपेक्षा आहे, अशी मागणी शेतकरीवर्ग करताना दिसत आहे.

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील खरिवली गावतील भगवान जाधव या शेतकऱ्याने सांगितले की, भात रोपही पाण्याअभावी  काढता येत नाही आणि त्याची लागवडही करता येत नाही .त्याचप्रमाणे गोऱ्हे गावातील एका शेतकऱ्याने भात लागवडीसाठी पाणी नाही म्हणून चक्क ओढ्या नाल्यातून पाणी आणून ते जमीन ओली करुन भिजवण्याचे काम सुरु केले आहे.  मग लागवड करित आहेत.हे विदारक दृश्य सध्या पालघर जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.