ईटन आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा भारतातील कोविड-19 मदत कार्याला पाठिंबा

समाजाला बळकट करण्याची वचनबद्धता राखत वैश्विक ऊर्जा व्यवस्थापन कंपनी ईटनच्या वतीने देशातील विविध भागांतील कोविड-19 मदत कार्याला साह्य देण्यात येत आहे.

पुणे: समाजाला बळकट करण्याची वचनबद्धता राखत वैश्विक ऊर्जा व्यवस्थापन कंपनी ईटनच्या वतीने देशातील विविध भागांतील कोविड-19 मदत कार्याला साह्य देण्यात येत आहे. ईटन इंडिया फाउंडेशनच्या अंतर्गत दान कार्यक्रमाद्वारे कर्मचाऱ्यांनी दिलेले आर्थिक योगदान आणि कंपनीचा निधी एकत्र करून ही सगळी रक्कम सध्याच्या अभूतपूर्व काळात मदत कार्यात आघाडीवर असलेले अग्रणी योद्धे आणि रोजंदारीवर पोट असलेल्यांना सुपूर्द करण्यात येत आहे.
 
ईटन इंडिया फाउंडेशन ही एक सार्वजनिक सेवाभावी संस्था आहे. ती भारतातील मुख्य प्रवाहात सामील झाली असून ईटन समुदायाच्या प्रयत्नांचा विस्तार करते आहे. सध्या देश झपाट्याने प्रसारित होणाऱ्या जीवघेण्या विषाणूशी मुकाबला करतो आहे. या विषाणूमुळे ज्यांचे जीवन विस्कटले गेले आहे, त्यांना मदतीचा हात देण्याचा ईटनचा प्रयत्न आहे. ईटन इंडिया फाउंडेशनने कोविड-19 संबंधित अनेक मदतपर उपाययोजनांना साह्य पुरवले. या माध्यमातून आघाडीवर असलेले योद्ध्यांच्या आरोग्याची देखभाल घेण्याच्या दृष्टीने सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. तर स्थलांतरित आणि रोजंदारीवर पोट असलेल्या मजुरांना आहार आणि रेशन साहित्याचे वाटप करण्यात आले. ही फाउंडेशन काही शहरांमध्ये स्थानिक पोलिसांसमवेत काम करत असून त्यांची सुरक्षा आणि स्वच्छतेकरिता साहित्य उपलब्ध करून देते आहे. 
 
ईटन कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या वैयक्तिक क्षमतेत मदत कार्याला सक्रिय साह्य केले. ईटन इंडिया फाउंडेशन’च्या कोविड मदत कार्यक्रमाकरिता अनेक जण पुढे आले. त्यांनी विषाणू प्रादुर्भावाचा फटका बसलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवली. कर्मचारी वर्ग फाउंडेशनच्या सध्याच्या शिक्षण प्रकल्पांवर देखील काम करत असून कंटेन्ट ऑनलाईन घेणे, शिक्षणापासून वंचित असलेल्यांना कमीत-कमी अडचणी येतील यादृष्टीने काम करत आहेत. 
 
ईटन इंडियाचे एचआर डायरेक्टर आशिष कपूर म्हणाले की, “सध्याच्या अनिश्चित काळात ईटनकडून प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी तसेच दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा तसेच पुरेशा उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. तरीही कोविड-19 योद्ध्यांसमोर असलेल्या आव्हानांचे आम्हाला भान आहे. ते शहरातील सर्वांना आरोग्यदायी राखण्यासाठी तसेच शहरे स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याकरिता स्वत:च्या जीवाची जोखीम नियमित घेत असतात. सध्याच्या आव्हानात्मक काळात असुरक्षित वर्गाला सर्वाधिक फटका बसल्याचे आम्ही पाहिले. त्यामुळे मदतीची गरज असलेल्या समाजातील वर्गासाठी उभे राहण्याची वेळ आम्ही ओळखली. आम्ही दिलेल्या अल्प योगदानामुळे काही व्यक्तींचा जीवनात थोडाफार फरक दिसून येईल.”

“ईटन’मध्ये आम्ही आमच्या समुदायाविषयी वचनबद्ध आहोत. आम्ही आमची जबाबदारी एक पाऊल पुढे नेट लोकांना त्यांच्या आयुष्यात साह्य करत समाजाची सेवा करण्याचा वसा घेतला आहे. आमच्या ईटन टीम सदस्यांनी सध्याच्या विपरीत परिस्थितीत मानवी सेवाभाव जपत दानकर्म स्वीकारले. ईटन’च्या वतीने समाजाचे ऋण फेडण्यासाठी वचनबद्धता जपण्यात येत होती आणि यापुढे देखील हा दातृत्वभाव जपण्यात येईल.”असेही त्यांनी पुढे नमूद केले.

ईटनने आवश्यक वैद्यकीय उपकरणे यशवंतराव चव्हाण मेमोरियल (वायसीएम) हॉस्पिटल आणि नायडू हॉस्पिटल / ससून हॉस्पिटल, पीसीएमसी यांना दान केली आहेत. रांजनगांवमध्ये करीगाव ग्रामपंचायतीत प्रवासी कामगारांना रोजचे भोजन वाटप करण्यात येत आहे.

ईटन इंडिया फाउंडेशनच्या वतीने पुणे, पुद्दुचेरी, कोइम्बतूर, रांजणगाव, अहमदनगर, नाशिक, बंगळूर, दिल्ली, चेन्नई आणि मुंबईत मदत कार्याचे आयोजन करण्यात आले असून त्याला पाठिंबा देण्यात आला. लवकरच अधिकाधिक भागांमध्ये ही योजना पोहोचवली जाईल.

ईटनविषयी:

ऊर्जा व्यवस्थापन तंत्रज्ञान आणि सेवेचा वापर करत जीवन आणि पर्यावरणाची गुणवत्ता सुधारण्याचे ईटनचे उद्दिष्ट आहे. आम्ही ग्राहकांना शाश्वत पर्याय देऊ करतो. जेणेकरून आमचे ग्राहक प्रभावीपणे इलेक्ट्रिकल, हायड्रोलिक आणि मेकेनिकल पॉवर प्रभावीपणे, अधिक सुरक्षित, अधिक सशक्तपणे आणि अधिक विश्वासाने वापरू शकतील. ईटन’कडे 21.4 डॉलर बिलियन इतका महसूल असून आम्ही 175 पेक्षा अधिक देशांना उत्पादनांची विक्री करतो. आमच्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 95,000 इतकी आहे. अधिक माहितीसाठी, या संकेतस्थळाला भेट द्या www.eaton.com