पर्यावरणपूरक घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

महाड: साद सह्याद्री प्रतिष्ठानने गणेशभक्तांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि त्याद्वारे पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण करणे हा उद्देश ठेवून पर्यावरणपूरक घरगुती गणपती सजावट स्पर्धा(ganpati decoration competition) आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाड(mahad) तालुक्यातून विविध भागांतील अनेकांनी आपला सहभाग नोंदवला होता. सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू, सजावटीसाठी लागणार वेळ, गणेशमूर्तीचे घडणीचे स्वरूप,दिलेला सामाजिक संदेश असे निकष लावून विजेते निवडले गेले.
या स्पर्धेत संकेत शिंदे (कोथेरी) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच ज्ञानेश्वर सुतार (वरंध) आणि बाळासाहेब गुंड (नागलवाडी एमआयडीसी) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला. तर उत्तेजनार्थ आकाश नथुराम कदम (किंजलोळी), हनुमंत पवार (गोठवली), प्रफुल्ल मालुसरे (गावडी), दिनेश विजय शेलार (पिंपळदरी) यांना देण्यात आला.