दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल नाही, विद्यार्थ्यांनी अफवांना बळी न पडण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन

यावर्षी कोरोनामुळे शालेय वर्ष उशीरा सुरू झालं. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षाही लांबल्या.यंदाच्या वर्षी बारावीची परीक्षा २३ एप्रिलपासून(twelfth exam) सुरू होईल तर २१ मे रोजी शेवटचा पेपर असणार आहे. दहावीची परीक्षा (tenth exam)२९ एप्रिलला सुरु होऊन २९ मे रोजी संपणार आहे.

    मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांची(corona patients in maharashtra) संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र कोरोनामुळे पुढच्या महिन्यात होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही, असे शिक्षण मंडळाने कळवले आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरल्यानुसारच होणार असल्याचं माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education) स्पष्ट केले आहे. शिक्षण मंडळाने परिपत्रक काढून या परीक्षेच्या वेळापत्रका बदल होणार नसल्याचे सांगितले.

    यावर्षी कोरोनामुळे शालेय वर्ष उशीरा सुरू झालं. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षाही लांबल्या.यंदाच्या वर्षी बारावीची परीक्षा २३ एप्रिलपासून सुरू होईल तर २१ मे रोजी शेवटचा पेपर असणार आहे. दहावीची परीक्षा २९ एप्रिलला सुरु होऊन २९ मे रोजी संपणार आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या शेवटी तर बारावीच्या परीक्षेचा निकाल जुलै महिन्याच्या शेवटी लागणार असल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. परीक्षेच्या तारखा आणि निकालाच्या तारखा यामध्ये बदल होणार नसून विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.

    कोरोनाची लागण झालेल्या किंवा क्वारंटाइनमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी आधीच दिली आहे. आता कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळेनुसार पार पाडणे हे राज्याच्या शिक्षण मंडळासमोरचे मोठे आव्हान आहे. हे आव्हान शिक्षण मंडळ कसे पेलणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.