books

पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर(reuse of old text books) करण्यात येणार असल्याचे विचाराधीन आहे. वापरात आलेली सुस्थितीतील पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांनी शाळेत जमा केल्यास पुस्तकांचे फेरवाटप हाेवू शकणार आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने(education department) पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर(reuse of old text books) करण्यात येणार असल्याचे विचाराधीन आहे. वापरात आलेली सुस्थितीतील पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांनी शाळेत जमा केल्यास पुस्तकांचे फेरवाटप हाेवू शकणार आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने(education department) पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्याचे शिक्षण विभागाने ठरविले आहे. २०१९-२० किंवा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात जुनी वापरलेली पाठ्यपुस्तके शाळेत जमा करावीत, असे आवाहन शिक्षण विभागाने पालक आणि विद्यार्थ्यांना केले आहे. या उपक्रमातून कागदाची बचत होईल व झाडांचे संवर्धन होण्यास मदत होणार असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.

समग्र शिक्षा योजनेंर्तगत इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना दरवर्षी सरकारकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. यासाठी दरवर्षी सुमारे २०० कोटी पेक्षा जास्त खर्च येतो. शालेय विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील पयार्वरणाचे महत्व समजावे या उद्देशाने अभ्यासक्रमात पयार्वरण विषयाचा समावेश केला आहे. तसेच कृतीयुक्त शिक्षणासाठी त्यांच्या गावातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. दुसरीकडे, पुस्तकांसाठी लागणाऱ्या कागदांसाठी अनेक झाडांवर कुऱ्हाड चालवली जात असते. त्यामुळे झाडे वाचविण्यासाठी शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तकांचे प्रायोगिक तत्वावर पुर्नवापर करण्याची योजना राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.

दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या पाठ्यपुस्तकांपैकी काही विद्यार्थी पाठ्यपुस्तकांची योग्य रितीने जपणूक करतात. अशा पाठ्यपुस्तकांचे संकलन करुन त्याचा पुर्नवापर केल्यामुळे पुढील वर्षी त्याचे फेरवाटप करणे शक्‍य हाेवू शकते, असा शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. तसेच यामुळे काही प्रमाणात कागदाचीही बचत हाेईल. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२१ मध्ये प्रायोगिक तत्वावर पाठ्यपुस्तकांचे पुनर्वापर करण्याचा प्रायोगिक तत्वावर राबवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने परिपत्रक जारी केले आहे.

मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना शिक्षण विभागाने आवाहन केले असून त्यानुसार २०१९-२० किंवा २०२०-२१ मधील जुनी वापरलेली पाठ्यपुस्तके शाळेत जमा करण्याची विनंती करण्यात आली आहे. ही योजना ऐच्छिक आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना पुस्तके सुस्थितीत ठेवण्याची सवय लागेल. मात्र, सध्या शाळा बंद असून शाळा सुरु हाेतील तेव्हा हा उपक्रम राबविण्यात यावा अशा सूचनाही शिक्षण विभागाने दिल्या आहेत. या उपक्रमातून किती पाठ्यपुस्तके जमा होतील. तसेच विद्यार्थी किंवा पालकांचा प्रतिसाद पाहून याबाबतचा निर्णय घेण्यात येईल,असेही विभागाने म्हटले आहे.