कोल्हापूरमध्ये तीन वर्षाच्या बालकाचे आठ भटक्या कुत्र्यांनी तोडले लचके

कोल्हापूर: पाचगाव ता.करवीर येथील योगेश्वर कॉलनीत राहणाऱ्या राहुल कांबळे यांच्या स्वराज नावाच्या तीन वर्षे वयाच्या मुलाला, तो दारात खेळत असताना आठ भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः त्याचे लचके तोडून गंभीर जखमी केले.प्रसंगावधान राखून आजूबाजूला असणाऱ्या शेजाऱ्यांनी आणि परिसरातील मोहम्मद शरीफ काझी या सामाजिक कार्यकर्त्याने या कुत्र्यांना हुसकावून लावून या बालकाला त्यांच्या तावडीतून सोडवून घेतले. मात्र आठ कुत्र्यांनी लचके तोडल्याने बालक जखमी झाल्याने त्याला तात्काळ कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून बालकाची प्रकृती चिंताजनक आहे.