child marriage

राजस्थानातील चित्तोडगड(chittodgad) येथे एका खाप पंचायतीने बालविवाहाला(child marriage) विरोध करणाऱ्या एका ज्येष्ठ व्यक्तीला १२ वर्षांसाठी जातीतून बहिष्कृत केले असलल्याची माहिती मिळाली आहे. हे प्रकरण समजल्यावर पोलिसांनी ११ जणांना अटक केली आहे.

भारतात  आजही विविध जातींमध्ये खाप पंचायती(khap panchayat) स्वतःच्या कायद्यानुसार चालत असतात.  यातील पंच मंडळी भ्रष्ट असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यांचे निवाडे हे अनेकदा बुद्धीला न पटणारे असतात. याचाच प्रत्यय राजस्थानमध्ये आला आहे.

राजस्थानातील चित्तोडगड(chittodgad) येथे एका खाप पंचायतीने बालविवाहाला(child marriage) विरोध करणाऱ्या एका ज्येष्ठ व्यक्तीला १२ वर्षांसाठी जातीतून बहिष्कृत केले असलल्याची माहिती मिळाली आहे. हे प्रकरण समजल्यावर पोलिसांनी ११ जणांना अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शिवलाल असं त्या बहिष्कृत केलेल्या ज्येष्ठ व्यक्तीचं नाव आहे. त्याने ‘बालविवाह’ आणि ‘मृत्यूभोज’ या पारंपरिक प्रथांना विरोध दर्शवला होता. त्यामुळे त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर १२ वर्षांसाठी बहिष्कार घालण्याचे आदेश खाप पंचायतीतील पंचांनी गावकऱ्यांना दिले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन रविवारी ११ पंचायत सदस्यांना पोलिसांनी ताब्यातं घेतलं.

याच वर्षी लॉकडाऊनदरम्यान जुलै महिन्यात सातखंडा गावात खाप पंचायत बोलावण्यात आली होती. तसेच यामध्ये ग्रामस्थांना बालविवाह आणि मृत्यूभोज चालू ठेवण्याबाबत मतं मागवण्यात आली होती. यावेळी ६५ वर्षीय व्यक्ती शिवलाल यांनी विरोध दर्शवला होता.

जर शिवलाल यांनी समाजातील प्रथांना विरोध केला तर त्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा पंचायतीतील वरिष्ठ सदस्यांनी दिला होता. त्यानुसार, ३० सप्टेंबर रोजी त्यांनी शिवलाल यांच्या कुटुंबाचे ‘हुक्का पाणी बंद’चे गावकऱ्यांना आदेश दिले होते. यावर खाप पंचायत थांबली नाही तर जो शिवलाल यांच्या कुटुंबियांशी व्यवहार ठेवेल त्याला १.१ लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचा इशाराही दिला. या प्रकारानंतर पीडित शिवलाल यांनी ३ ऑक्टोबर रोजी पोलिसांत धाव घेत खाप पंचायतीतील १८ जणांविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी कारवाई करत ११ जणांना अटक केली आहे.