वडवली ते आंबिवली स्टेशन दरम्यानचा विद्युत पोल कोसळला

वडवली गाव ते आंबिवली स्टेशन रस्त्यादरम्यान महावितरणाचा जुना गंजलेला सडलेला धोकादायक विद्युत पोल होता. आज पहाटे तीनच्या सुमारास हा धोकादायक महावितरणाचा विद्युत पोल रस्त्यात कोसळल्याने वडवली,अटाळी, आंबिवली, परिसरासह मोहने, फुलेनगर परिसरातील बत्ती गुल झाली.

कल्याण: वडवली गाव ते आंबिवली रेल्वे स्टेशन रस्त्या दरम्यान  महावितरणाचा विद्युत पोल रस्त्यात कोसळून पडल्याने वडवली,अटाळी, आंबिवली, परिसरासह मोहने, फुलेनगर परिसरातील बत्ती गुल झाल्याने महावितरणाच्या भोगंळ कारभाराचा फटका विद्युत ग्राहकांना बसला आहे.

वडवली गाव ते आंबिवली स्टेशन रस्त्यादरम्यान महावितरणाचा जुना गंजलेला सडलेला धोकादायक विद्युत पोल होता. आज पहाटे तीनच्या सुमारास हा धोकादायक महावितरणाचा विद्युत पोल रस्त्यात कोसळल्याने वडवली,अटाळी, आंबिवली, परिसरासह मोहने, फुलेनगर परिसरातील बत्ती गुल झाली. धोकादायक  गंजलेले  सडलेले विद्युत पोल बदलणेबाबत  स्थानिक नगरसेवक हर्षाली थवील यांनी महावितरणला पत्र दिले होते. मात्र महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे हा धोकादायक विद्युत पोल अखेर रस्त्यात कोसळला व विद्युत वाहक तारा रस्त्यावर लोबंकळल्या सुदैवाने पहाटेची वेळ व वाहनांची वर्दळ नसल्याने मोठा अर्नथ टळला.

 वडवली ,अटाळी, आंबिवली, मोहने,  फुलेनगर, गाळेगाव, परिसरात वीजेचा लपंडाव नेहमीच या ना त्या कारणे सुरु असल्याने वीज ग्राहकांना महावितरणचा भोगंळ कारभार कधी सुधारणार अशी ओरड होत आहे. महावितरण उप अभियंता विजय यादव यांच्याशी संपर्क साधला असता नवीन पोल टाकण्याचे काम तातडीने सुरु केले असुन वडवली आंबिवली, अटाळी परिसरातील विद्युत पुरवठा संध्याकाळपर्यंत सुरळीत सुरु होईल . जुने मोडकळीस आलेले विद्युत पोल सर्वेक्षणाचे काम सुरु असुन ते बदलण्याचे काम सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले.