सुधागड तालुक्याचा वीजपुरवठा उद्या ७ तास बंद

पाली : कानसई येथील पॉवर स्टेशनमध्ये देखभाल व दुरुस्तीचे काम होणार असल्याने उद्या सुधागड तालुक्याचा वीज पुरवठा सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत बंद राहणार आहे.  तसेच कामानुसार वेळेत फेरबदल होऊ शकतो, अशी माहिती महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी, पाली यांच्याकडून देण्यात आली.