मुंबईकरांवर आज नवे संकट – अनेक भागात बत्ती गुल

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. आज सकाळपासून वीज गायब झाली आहे. ग्रीड फेल्युअरमुळे मुंबईतील वीज गायब झाल्याची माहिती मिळाली आहे. एमएसईबी, बेस्ट आणि अदानीची वीज गेल्यामुळे मुंबई शहरातील कार्यालयांचा कारभारही ठप्प पडला आहे. याचा परिणाम लोकल सेवांवरही झाला असून मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

कोरोना संकटामुळे मुंबई ठप्प झाली होती, त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई शहर गतीमान होते आहे, असे वाटत असतानाच शहरावरील संकटांची मालिका संपताना दिसत नाहीये. बेरोजगारी, लोकल सेवा बंद, अतिवृष्टी या सारख्या संकटांचा सामना करत असलेल्या मुंबईवर वीज गायब होण्याचे नवे संकट ओढवले आहे.

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. आज सकाळपासून वीज गायब झाली आहे. ग्रीड फेल्युअरमुळे मुंबईतील वीज गायब झाल्याची माहिती आहे. एमएसईबी, बेस्ट आणि अदानीची वीज गेल्यांमुळे मुंबई शहरातील कार्यालयांचा कारभारही ठप्प पडला आहे. याचा परिणाम लोकल सेवांवरही झाला असून मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकलही जागच्या जागी उभ्या आहेत. संपूर्ण एमएमआरडीए क्षेत्रात या ग्रीड फेल्युरचा फटका पाहायला मिळतो आहे.(electricity supply shortage in mumbai)

बेस्टने यासंदर्भात ट्विट केले आहे की, टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच महापारेषणच्या ४०० केव्ही कळवा पडघा जीआयएस केंद्रात सर्किट १ देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट २ वर होता. मात्र सर्किट २ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित आहे.वीज पुरवठा पुर्ववत होण्यासाठी साधारण ४५ मिनिटे ते १ तास लागणार आहे

दरम्यान वीज गेल्याने, पालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांचे हाल झाले आहेत, सध्या जनरेटवर काम सुरु असले तरीही ही हे फक्त ३ तास सुरु राहण्याची क्षमता आहे. त्यापूर्वी लाइट येणे गरजेचे असल्याचे एका वरिष्ठ डॉक्टरकडून सांगण्यात आले.

मुंबईतील कार्यालये  २४ तास कार्यरत असतात. त्याचबरोबर रुग्णालयांमध्येही कोरोनासह इतर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. वीज गायब झाल्याचा परिणाम सर्वच कार्यालये आणि रुग्णालयांवर होताना दिसत आहे. २४ तास वीज असणारे शहर अशी मुंबईची ओळख आहे, त्यामुळेच अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची पहिली पसंती ही मुंबईला असते. मात्र या ग्रीड फेल्युअलरमुळे मुंबईच्या प्रतिष्ठेवरही परिणाम झाला आहे. वीज गेल्यामुळे लोकल सेवाही ठप्प झाली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु आहे. लोकल बंद पडल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही अडकले आहेत. अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर उतरुन चालत आपले कार्यालय गाठण्याचा प्रयत्न करणारे कर्मचारी पाहायला मिळत आहेत. काही भागात सिग्नल यंत्रणादेखील बंद पडली आहे.