electricity

 कल्याण : कल्याण ग्रामीण महावितरण अंतर्गत गोवेली येथे सब स्टेशनमध्ये ब्रेकरची समस्या झाल्याने काल रात्री उशिरापासून टिटवाळ्यासह ग्रामीण भागातील बत्ती गुल झाल्याने वीज ग्राहकांना बराच काळ अंधारात राहावे लागले. कल्याण  ग्रामीणसह टिटवाळ्यातील बत्ती मंगळवारी रात्री गुल झाल्याने वीज ग्राहक नेहमीच होणाऱ्या बत्ती गुलने हैराण झाले आहेत.

टिटवाळा महावितरणचे आभियंता महाजन यांच्यशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री वादळी वारा व जोरदार पावसामुळे गोवेली सब स्टेशनमधील ब्रेकर मध्ये फॉल्ट झाल्याने वीज जात येत होती. बुधवारी दुपारी वीज पुरवठा खंडित करून ब्रेकर बदलून वीज पुरवठा चारच्या सुमारास सुरळीत करण्यात आला.