डोंबिवलीमध्ये केमिकल कंपनीत स्फोट

डोंबिवली : डोंबिवली औद्योगिक विभागातील फेस २ येथील अंबर केमिकल कंपनीमध्ये रिऍक्टरचा स्फोट झाल्याने  पुन्हा एकदा डोंबिवली औद्योगिक विभाग हादरून गेल्याने लोकांची तारांबळ उडाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रथम दर्शनी समजत असून कोणाला दुखापत झाली का याचा शोध घेतला जात आहे.

कंपनीत झालेल्या  स्फोटाच्या हादऱ्यांमुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिक भयभीत होऊन घराबाहेर आले. काही वर्षांपूर्वी झालेल्या प्रोबेस कंपनीतील स्फोटामुळे मोठी हानी झाली होती.  या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले असून यामध्ये कोणाला दुखापत झाली किंवा नाही याबाबत अद्याप ठोस माहिती मिळाली नसून शेजारील कंपनीचे नुकसान झाल्याचे समजते आहे. तर कंपनीतील रिऍक्टरच्या गॅसकेटचे तुकडेही शेजारील इमारतींमध्ये जाऊन पडल्याची माहिती समोर येत आहे.