marathwada factory

यंदा सांगली जिल्ह्यात सहकारी व खासगी अशा १५ साखर कारखान्यांना गाळप परवाना देण्यात आला होता. परंतु यातील १२ कारखाने प्रत्यक्षात सुरु झाले आहेत. तासगाव, डफळे कारखाना जत आणि यशवंत कारखाना नागवेवाडी या तीन कारखान्यांना गाळपाचा परवाना मिळाला असला तरी अद्याप गाळप काढणे सुरु झाले नाही.

सांगली : कोरोना काळात (corona) मागील ७ महिन्यांपासून बंद असलेल्या सहकारी व खासगी कारखान्यांचा हंगाम सुरु (Factory season begins) झाला आहे. परंतु कारखान्यात काम करण्यासाठी मजुर गैरहजर ( labor shortage) आहेत. कोरोना काळात अनेक मजुर आपल्या मुळगावी परतले असल्यामुळे काखान्यात मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. अनक महिन्यांच्या नंतर कारखाने सुरु झाले असल्यामुळे अधिकाधिक गाळप करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मागील तीन आठवड्यांच्या तुलनेत साखर कारखान्यांतून साडे चौदा लाख टन उसाचे गाळप करुन १४ लाख ७० हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर सरासरी उतारा हा १०.१७ इतका आहे.

यंदा सांगली जिल्ह्यात सहकारी व खासगी अशा १५ साखर कारखान्यांना गाळप परवाना देण्यात आला होता. परंतु यातील १२ कारखाने प्रत्यक्षात सुरु झाले आहेत. तासगाव, डफळे कारखाना जत आणि यशवंत कारखाना नागवेवाडी या तीन कारखान्यांना गाळपाचा परवाना मिळाला असला तरी अद्याप गाळप काढणे सुरु झाले नाही. तसेच अजून ३ कारखाने बंद असल्यामुळे १२ कारखानेच सुरु असल्याचे दिसत आहेत.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटामुळे कारखान्यांपुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. कारखान्यात बरेच ऊसतोड मजूर अडकून पडले होते. त्यामुळे त्यांचे राहणे व जेवणाची व्यवस्था कारखाना प्रशासनास करावी लागली होती. यानंतर या मजुरांना विशेष गाडीद्वारे त्यांच्या राज्यात सोडण्याची व्यवस्था करावी लागली होती. आता कोरोनाची परिस्थिती कायम असताना कारखान्यांचा हंगाम सुरु झाला आहे. परंतु मजुरांची टंचाई या कारखान्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक कारखाने कमी प्रमाणात गाळप काढत आहेत. मजुरांची कमतरता असली तरी हंगामाच्या शेवटी अधिकाधिक गाळप करण्यासाठी कारखाना प्रशासनाला कसरत करावी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. कामगारांची कमतरता असल्यामुळे अनेक भागांत ऊसतोडीसाठी ज्यादा पैसे द्यावे लागत आहेत.