girl busy in online education

कर्नाटकातील मांड्यामध्ये एका पित्याने मुलीला ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल दिला खरा पण या मोबाईलमधून त्याची दुसरीच भानगड बाहेर आली आहे.

कोरोना(corona) व्हायरसमुळे अजूनही मुलांच्या घरून ऑनलाईन शाळा(online schooling) सुरु आहेत. लॅपटॉप किंवा मोबाईलच्या माध्यमातून मुलं शाळांच्या या ऑनलाईन वर्गाला उपस्थित राहतात. कर्नाटकातील मांड्यामध्ये एका पित्याने मुलीला ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल(online education on mobile) दिला खरा पण या मोबाईलमधून त्याची दुसरीच भानगड बाहेर आली आहे.(father`s video clip found by daughter)

मुलगी ऑनलाईन वर्गाला उपस्थित राहण्यासाठी मोबाईल चाळत असताना तिला वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल समजले. वडिलांचा दुसऱ्या  महिलेसोबतचा व्हिडिओ तिला सापडला. तिने हे लगेच आईला सांंगितले आणि मग वाद  निर्माण झाला.

पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पत्नीने १८ वर्षांच्या संसारानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पती त्यासाठी तयार नाही. या जोडप्याला दोन मुली आहेत. नवऱ्याने विवाहबाह्य संबंधाबाबत कुणाला सांगितले नव्हते. मात्र  मुलीला बाराव्या इयत्तेच्या ऑनलाईन वर्गाला उपस्थित राहता यावे, यासाठी त्याने आपला मोबाईल दिला. हा फोन चाळत असताना तिला वडिलांचा दुसऱ्या एका महिलेसोबतचा व्हिडिओ दिसला. पतीच्या या प्रकरणाबद्दल समजल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार केली आहे.