माजी रणजी क्रिकेटपटू शेखर गवळी यांचा मृत्यू

नाशिक: राज्यातील माजी रणजी क्रिकेटपटू(ranji cricket player) शेखर गवळी(shekhar gawli) यांचा मृत्यू(death) झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीजवळ ट्रेकिंग करताना ते दरीत कोसळले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी ते दरीत कोसळल्याचे समजले होते. मात्र त्यांचा मृतदेह सापडला नव्हता. अंधार आणि पाण्याच्या प्रवाहामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली होती. आज सकाळी  आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाने शोधमोहीम सुरु केली. त्यानंतर शेखर यांचा मृतदेह दरीत सापडल्याचे समजते.

मुळचे नाशिकचे असणारे शेखर गवळी हे महाराष्ट्राच्या २३ वर्षाखालील क्रिकेट संघाचे फिटनेस प्रशिक्षक(fitness trainer) म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि २ मुले असा परिवार आहे.

शेखर गवळी हे मंगळवारी इगतपुरी भागामध्ये काही जणांसोबत ट्रेकिंगला गेले होते. एका कठड्याजवळ उभे असताना त्यांचा पाय घसरल्यामुळे ते २०० फूट खोल दरीत पडले. आज त्यांचा मृतदेह सापडला आहे.