kumbhmela haridwar

कुंभमेळ्यातील(kumbhmela haridwar) शाही स्नानाच्या(shahi snan) दिवशी हरकी पैडीवर भाविकांना गंगा नदीत स्थान करता येणार नाही. मात्र, इतर सहा स्नान पर्वावर सहजरित्या नोंदणी केल्यानंतर भाविकांना हरकी पैडीवर स्नान करता येतील. पुढील महिन्यात १४ जानेवारीला सुरू होणाऱ्या शाही स्नान सोहळ्यासाठी पोलीस आणि प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

हरिद्वार : कुंभमेळ्यातील(kumbhmela haridwar) शाही स्नानाच्या(shahi snan) दिवशी हरकी पैडीवर भाविकांना गंगा नदीत स्थान करता येणार नाही. मात्र, इतर सहा स्नान पर्वावर सहजरित्या नोंदणी केल्यानंतर भाविकांना हरकी पैडीवर स्नान करता येतील. पुढील महिन्यात १४ जानेवारीला सुरू होणाऱ्या शाही स्नान सोहळ्यासाठी पोलीस आणि प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. शाहीस्नानदिनी दिल्लीत येणाऱ्या भाविकांना मध्य हरिद्वार आणि देहराडूनवरून येणाऱ्या भाविकांना उत्तर हरिद्वार येथील गंगा घाटांवर स्नान करावे लागेल. शाही स्नानादरम्यान गर्दी होऊ नये, यासाठी तयारी केली जात आहे.

कोरोनामुळे बदल

शाही स्नानदिनी हरकी पैडीवर पेशवाई आणि आखाडे स्नान करतात. २०२१ मध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीला आतापासूनच जोर आला आहे. कोरोनामुळे यावेळी कुंभमेळ्यात अनेक बदल दिसून येतील. भाविकांना पहिल्यांदाच येथे येण्यापूर्वी पोर्टलद्वारे नोंदणी करावी लागेल. कुंभचे पहिले स्नान १४ जानेवारी रोजी होईल. मेळावा प्रशासनाने १०७ तासांच्या स्नानासाठी कंबर कसली आहे. नोंदणीसाठी एक विशेष पोर्टल तयार केले जाणार आहे. पोर्टलमध्ये गंगा घाटाचे नावही नमूद असतदील. शाही स्नानानिमित्त हरकी पैडीवर भाविकांना यात्रेकरूंना येऊ दिले जाणार नाही.

या दिवशी परवानगी नाही- पहिले शाही स्नान ११ मार्च, महाशिवरात्री, दुसरे शाही स्नान १२ एप्रिल, सोमवती अमावस्या, तिसरे शाही स्नान १४ एप्रिल वैशाखी, मेष पौर्णिमा, चौथे शाही स्नान २७ एप्रिल, चैत्र पौर्णिमा

या दिवशी परवानगी –  १४ जानेवारी मकर संक्रांत, ११ फेब्रुवारी मौनी अमावस्या, १३ फेब्रुवारी – वसंत पंचमी, २७ फेब्रुवारी -माघ पौर्णिमा,
१३ एप्रिल – नव संवत्सर