भिवंडीत शांततेत गणेश विसर्जन

भिवंडी : भिवंडीत(bhivandi) गुरुवारी सायंकाळी गौरी गणपतीचे विसर्जन अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत आहे . शहरातील नऊ विसर्जन घाटावर महानगरपालिका स्वच्छता विभाग ,अग्निशामक दल व पोलीस पथक तैनात असून विसर्जन घाटावर गर्दी टाळण्यासाठी गणेश मूर्तींसह फक्त दोन गणेशभक्तांना प्रवेश दिला जात असल्याने विसर्जन घाटावर गडबड गोंधळ न होता अत्यंत शांततेत विसर्जन पार पडले .

पद्मानगर कामतघर या ठिकाणी कपिल पाटील फाऊंडेशनच्या वतीने नगरसेवक सुमित पाटील यांच्या वतीने मोठ्या डंपरमध्ये कृत्रिम तलाव बनवून त्यामध्ये गणेश विसर्जनाची व्यवस्था करून दिली असल्याने गणेशभक्त मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी मूर्ती विसर्जनासाठी घेऊन येत होते .