murder

आई-वडिल प्रेमसंबंधाला विरोध करतात म्हणून एका अल्पवयीन मुलीने प्रियकरासोबत मिळून पालकांची हत्या(parents murder) केल्याचा प्रकार उघड झाला आहे.  मुलीला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक(arrest) केली आहे.

प्रेमासाठी आजकाल काहीही करण्यास तरुण- तरुणी तयार असतात. याचेच एक उदाहरण मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये(Indore) दिसून आले  आहे. आई-वडिल प्रेमसंबंधाला विरोध करतात म्हणून एका अल्पवयीन मुलीने प्रियकरासोबत मिळून पालकांची हत्या(parents murder) केल्याचा प्रकार उघड झाला आहे.  मुलीला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक(arrest) केली आहे. आई-वडिलांची हत्या केल्यानंतर मुलगी प्रियकरासोबत राजस्थानला पळून जात होती. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी दोघांकडून एक लाख रुपये आणि हत्येसाठी वापरण्यात  आलेले शस्त्र जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेले पैसै मुलीने घरातून चोरले होते.  गुरुवारी घराच्या बेडरुममध्ये पती-पत्नी मृतावस्थेत आढळले. धारदार शस्त्राने भोसकून त्यांची हत्या करण्यात आली होती. घरातील जर्मन शेपर्ड कुत्र्याला प्रवेशद्वारावर बांधण्यात आले होते. पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा घरातील सीसीटीव्ही कॅमेरा बंद होता.

मुलीने वडिलांवर आरोप करणारी चिठ्ठी लिहिली होती. त्यावरून पोलिसांना तपास करणे सोपे गेले. गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी तपास पथके बनवली.अनेकांची जबानी नोंदवण्यात आली. हत्या  झालेल्या भागातल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली.

मुलगी आणि तिच्या प्रियकराचा फोन सर्व्हेलन्सवर ठेवण्यात आला. प्रियकराने काही सेकंदासाठी त्याचा मोबाईल फोन चालू केला आणि पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा कळला. इंदूरपासून २८० किमी अंतरावरील मंदसोर-नीमच हायवे वर ते होते. त्यानंतर त्या दोघांना अटक करण्यात आले.