पत्रीपुल आणि माणकोली पुलाला हेरिटेजचा दर्जा द्या – आ. राजू पाटील यांचा टोला

कल्याण : कल्याण डोंबिवलीकरांच्या पुलकोंडीमुळे नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला समोरे जावे लागत आहे. त्यामध्ये कल्याणमधील पत्रीपुल, दुर्गाडी पूल डोंबिवली मधील कोपरपूल आणि माणकोली पूल यांची कामे अत्यंत कासवगतीने सुरू आहेत. तर नवीन पलावा पुलाचे फक्त पिलर बांधून सोडून दिले आहे.त्यामुळे पुलकोंडी झाली असून ट्रॅफिक जॅम होत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलेल्या आश्वासनांचा पुरता बोजवारा उडाला आहे. तर सतत सत्ताधारी नवीन नवीन तारखा देत आहेत. पूलाबाबत  डोंबिवलीमध्ये मनसेचे आमदार राजू पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता आमदारांनी पत्रीपुल आणि माणकोली पुलाला आता हेरिटेजचा दर्जा द्या असा टोला लगावला आहे.