Corona Virus Image

राज्यात आजपर्यंत एकूण कोरोनामुक्त रुग्ण ९,७३,२१४ झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.८६ % एवढे झाले आहे. राज्यात आज एकूण २,७४,९९३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबई : आज राज्यात(state) १९,१६४ नवीन कोरोना रुग्णांची(corona patients) नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १२,८२,९६३ झाली आहे. तर आज १७,१८४ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण कोरोनामुक्त रुग्ण ९,७३,२१४ झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.८६ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २,७४,९९३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज राज्यात ४५९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६८ % एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण ४५९ मृत्यूंपैकी २५६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ७८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ७८ मृत्यू पुणे -१७, सातारा -१३, नागपूर -७, जळगाव -६, नाशिक -६, कोल्हापूर -५, ठाणे -५, वर्धा -५, रायगड -३, वाशिम -२, सिंधुदुर्ग -२, अकोला -१, अमरावती -१, जालना -१, परभणी -१, रत्नागिरी -१, सांगली -१ आणि पालघर – १असे आहेत. दरम्यान आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६१,९०,३८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२,८२,९६३ (२०.७२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात १८,८३,९१२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३३,४१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.