pankaj ashiya

भिवंडी :शहरातील अतिधोकादायक इमारती मालमत्ता(property) पूर्णपणे निर्मनुष्य करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला असून त्यासाठी नागरीकांनी सहकार्य करून अशा इमारतींमधील वापर टाळावा व नागरीकांनी अनधिकृत इमारतींमध्ये मालमत्ता(illegal property) खरेदी करू नये, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ पंकज आशिया(pankaj ashiya) यांनी केले आहे . शहरातील अतिधोकादायक व अनधिकृत मालमत्तांच्या संदर्भात आयोजित केलेल्या आढावा बैठकीमध्ये(meeting) बोलत होते .या बैठकीस मुख्यालय व अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ दीपक सावंत , नगररचना सहाय्यक संचालक प्रल्हाद होगे पाटील ,शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड , जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले आदी अधिकारी उपस्थित होते.

शहरातील सर्व अतिधोकादायक मालमत्तांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २६८ अनव्ये नोटीस बजावून मिळकती रिकाम्या करण्या बाबत वारंवार कळविण्यात आले आहे .शहरात सध्या अतिधोकादायक २५ इमारती असून त्यापैकी ६ इमारती तोडण्यात आल्या असून १९ मालमत्ता निर्मनुष्य करून तोडण्याची कारवाई सुरू असून ,धोकादायक वर्गात ८२ इमारतींचा समावेश होत असून त्यापैकी ७७ निर्मनुष्य करण्यात आल्या असून तीन इमारतीं बाबत न्यायालयीन प्रकरण सुरू असून दोन इमारतीं वर लवकरच कारवाई होणार असल्याची माहिती आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे .

यासोबतच शहरातील नादुरुस्त २२२ इमारतींना नोटीस बाजाविण्यात अली असून अशा इमारतींचा पाणी व विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. ज्या इमारतीं बाबत बांधकाम स्थापत्य समिती तज्ञ यांनी सुचविलेली संरचनात्मक संभाव्य बदल करून मालमत्ता वापरण्यास योग्य असल्याचे स्थापत्य प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे .परंतु अनेक मालमत्ता धारकांनी असे केल्याचे आढळून येत नसून त्यामुळे अशापैकी एखादी मालमत्ता पडून संभाव्य वित्त व जीवितहानी झाल्यास त्यास महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही असा इशारा शेवटी आयुक्तांनी दिला आहे. त्या सोबत शहरातील अनधिकृत इमारतींना पाणीपुरवठा ,मलनि:सारण, विद्युत जोडणी देण्यात येणार नसून अशा मालमत्तांचे हस्तांतरण करण्यात येणार नाही. त्यामुळे नागरीकांनी आपल्या कष्टाच्या पैशातून अनधिकृत इमारतींमध्ये घर खरेदी करू नये,असे आवाहन आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी नागरीकांना केले आहे .