governor koshyari and eknath khadse

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(bhagatsingh koshyari) यांनी एकनाथ खडसेंचे(eknath system) कौतुक केले आहे. राज्यपालांनी एकनाथ खडसे यांचं कौतुक केल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

भारतीय जनता पक्ष सोडून एकनाथ खडसेंनी(eknath khadse) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (governor bhagatsingh koshyari) यांनी एकनाथ खडसेंचे कौतुक केले आहे. विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त जागांसाठी पाठवण्यात आलेल्या नावांमध्ये एकनाथ खडसेंच्या नावाचाही समावेश आहे. राज्यपालांनी विधान परिषदेच्या जागांबाबतचा निर्णय जाहीर केलेला नाही. मात्र अचानक राज्यपालांनी एकनाथ खडसे यांचं कौतुक केल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

एकनाथ खडसे यांनी सुनील नेवे लिखित त्यांचं आत्मचरित्र ‘जनसेवा मानबिंदू एकनाथराव खडसे’ या पुस्तकाची प्रत भगतसिंह कोश्यारी यांना पाठवली होती. भगतसिंह कोश्यारी यांनी पुस्तकावर अभिप्राय लिहून पाठवला आहे. यामध्ये राज्यपालांनी एकनाथ खडसेंच्या कामाच कौतुक केलं आहे.

राज्यपालांनी आपल्या अभिप्राय असलेल्या पत्रामध्ये लिहीले आहे की, “जनसेवा मानबिंदू एकनाथराव खडसे हा डॉ. सुनिल नेवे यांनी लिहिलेला ग्रंथ प्राप्त झाला. पुस्तकाच्या माध्यमातून आपले व्यक्तीमत्व, आपले समाजकारण, राजकारण, संसदीय कार्य, वैचारिक भूमिका तसेच विधानसभा सदस्य म्हणून योगदान यांसह आपल्या व्यापक सेवाकार्य यांचा अभ्यासपूर्ण आलेख मांडला आहे. यानिमित्त मी आपले हार्दिक अभिनंदन करतो आणि आपणास सुयश चिंतितो”,  हा अभिप्राय १ ऑक्टोबरला पाठवण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार १२ नावांची यादी बंद पाकिटात राज्यपालांना सादर करण्यात आली आहे. यामध्ये एकनाथ खडसे यांचाही समावेश आहे.
राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या १२ नावांची यादी
राष्ट्रवादी – एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, गायक आनंद शिंदे
शिवसेना – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी
काँग्रेस – सचिन सावंत, मुझ्झफर हुसेन, रजनी पाटील आणि गायक अनिरुद्ध वनकर