govind mohite

महाराष्ट्र इंटकच्या(maharashtra intak) सरचिटणीसपदी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांची तर कार्याध्यक्षपदी खजिनदार निवृत्ती देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई: महाराष्ट्र इंटकच्या(maharashtra intak) सरचिटणीसपदी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांची तर कार्याध्यक्षपदी खजिनदार निवृत्ती देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र इंटकच्या कार्यकारिणीतील हे बदल केंद्रीय इंटकचे अध्यक्ष डॉ.संजीवा रेड्डी यांच्या मान्यतेने करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी १जानेवारीला कार्यकारिणीमधील बदल एका पत्राद्वारे तातडीने जाहीर केले आहेत. लवकरच उर्वरित कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात येईल,असेही जयप्रकाश छाजेड यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर यांनी या नियुक्तीचे स्वागत केले आहे.
गोविंदराव मोहिते गेली ४० वर्षे कामगार चळवळीत कार्यरत आहेत.केंद्रीय इंटकच्या टेक्साईल वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस म्हणून त्यांनी यशस्वी नेतृत्व केले आहे. कामगारांच्या विविध लढ्यात योगदान दिले आहे. महाराष्ट्र इंटक मधील सरचिटणीसपद महत्त्वाचे मानण्यात येते.

गोविदराव मोहिते यांच्या या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई यांनीही संघटनेच्या विविध पदावर कामे केली असून,महाराष्ट्र इंटकमध्ये ते अनेक वर्षे कार्यरत आहेत.इंटकच्या कार्याध्यक्षपदी के.के.नायर यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.