गुजराती समाजाने कोरोना योद्ध्यांना बांधल्या राख्या

कल्याण : बृहद गुजराती समाज, कल्याण यांच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कोरोना योद्ध्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरेे करण्यात आले. लॉकडाऊन असल्याने गुजराती समाजाने बच्चे कंपनीला विरंगुळा व त्यांच्यातील कल्पकतेला वाव देण्यासाठी वेस्ट मटेरीयलमधून घरी राख्या बनविण्याची स्पर्धा आयोजित केली होती. या बच्चे कंपनीने बनविलेल्या राख्या कोरोना योद्धे डॉक्टर, पोलीस, पत्रकार बांधवांना बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पत्रकार कक्षात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत गुजराती समाज, कल्याणचे गिरिष धोकिया, (अध्यक्ष), अनवेश जोशी,  (प्रोजेक्ट चेअरमन) ,कमल आडतिया ( उपाध्यक्ष) तसेच  महिला सदस्या भावना मनराजा, अल्पा गादेर, हिना चावढा यांनी पत्रकार अतुल फडके, दत्ता बाठे, दिपक मोरे, दिनेश जाधव ,दिपक बागुल या कोरोना काळात असणाऱ्या पत्रकारांना राख्या बांधून आनोखे रक्षाबंधन साजरे केले.