कोरोनाची दुसरी लाट ओसरणार, लॉकडाऊनही टळणार – आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला विश्वास

राज्यात रुग्णसंख्येत(corona patients in maharashtra) वाढ झालेली दिसून आली तरीही, या दुसऱ्या लाटेत(second wave of corona) मृत्यू दर(death rate) तुलनेने कमी असल्याचे राज्य आराेग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरदिवशी होणारे सरासरी मृत्यू व मृत्यूचे शेकडा प्रमाण लक्षणीयरित्या कमी होताना दिसत आहे.मृत्यूदर फेब्रुवारीच्या तुलनेते कमी असल्याने लवकरच काेराेनाची दुसरी लाट ओसरेल असा विश्वास आराेग्य विभागाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

  नीता परब,मुंबई: मुंबई, पुणे या शहरात काेराेना रुग्णसंख्या वाढत असली तरीही, दुसऱ्या लाटेचे केंद्रबिंदू ठरलेल्या अकाेला, अमरावतीसह विदर्भातील इतर जिल्ह्यात काेराेना रुग्णबाधितांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. तर मृत्यूदर फेब्रुवारीच्या तुलनेते कमी असल्याने लवकरच काेराेनाची दुसरी लाट ओसरेल असा विश्वास आराेग्य विभागाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

  विदर्भातील ज्या जिल्ह्यांमध्ये दुसरी लाट सर्वप्रथम सुरु झाली त्या अकाेला व अमरावती जिल्ह्यात आता हळूहळू रुग्ण संख्या कमी हाेताना दिसून येत आहे. विशेषत: अमरावती शहरात २८ फेब्रुवारीच्या दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत ८० टक्क्यांनी घट झाली असल्याची सकारात्मक बाब दिसून येत आहे. ज्यामुळे येत्या दाेन ते तीन आठवड्यात राज्यातील इतर भागातही रुग्णसंख्या कमी हाेणार असे आराेग्य विभागाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

  रुग्णसंख्या वाढली पण मृत्यूदर घटला
  २१ मार्चला राज्यातील सर्वाधिक दैनंदिन काेविड रुग्णांची नाेंद झाली हाेती. या दिवशी तब्बल ३० हजार ५३५ रुग्ण आढळून आले हाेते. यापूर्वी सर्वाधिक रुग्ण १७ सप्टेंबर २०२० राेजी २४ हजार ८८६ नाेंदविले हाेते. राज्यात रुग्णसंख्येत वाढ झालेली दिसून आली तरीही, या दुसऱ्या लाटेत मृत्यू दर तुलनेने कमी असल्याचे राज्य आराेग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरदिवशी हाेणारे सरासरी मृत्यू व मृत्यूचे शेकडा प्रमाण लक्षणीयरित्या कमी हाेताना दिसत आहे. ऑक्टाेबर महिन्यात दरदिवशी २०० हून अधिक मृत्यू हाेत हाेते. पण ते प्रमाण सध्या ५२ ते ६० दरम्यान आहे.

  राज्यातील विदर्भातील अकाेला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये दुसरी लाट सर्वप्रथम सुरु झाली पण आता या जिल्ह्यात हळूहळू रुग्णसंख्या कमी हाेताना दिसून येत आहे. परिणामी, येत्या दाेन ते तीन आठवड्यात इतर राज्यातील भागातही रुग्णसंख्या कमी हाेताना दिसू लागेल पण त्यासाठी आपण सर्वांनी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. असे केल्यास आपण काेराेनाला हरवू शकताे.

  डाॅ. प्रदिप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, एकात्मिक राेग सर्वेक्षण कार्यक्रम

   राज्य सरकारचा दहा कलमी कार्यक्रम अमंलात आणण्याचे आराेग्य विभागाचे आवाहन

  • समूहात असताना मास्क वापरा.
  • साबण – पाणी / सॅनिटायझरच्या मदतीने हातांची स्वच्छता राखा.
  • प्रत्येक ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये २ मीटरचे अंतर ठेवा.
  • अगदी गरज असेल तेव्हाच प्रवास करा. अनावश्यक प्रवास टाळा. विनाकारण हॉटेलिंग टाळा.
  • कौटुंबिक कार्यक्रम, समारंभ साध्या पध्दतीने आणि गर्दी टाळून साजरे करा. अशा कार्यक्रमात कोविड अनुरुप वर्तनाचा अवलंब करा.
  • स्वतःला किंवा घरातील कोणाला फ्ल्यू सारखी लक्षणे असतील ती लपवू नका. वैद्यकीय सल्ल्याने कोविड चाचणी करुन घ्या.
  • ज्या व्यक्तींचा जनसंपर्क अधिक आहे ( सुपरस्प्रेडर) त्यांनी कोविड अनुरुप वर्तन ठेवणे आवश्यक आहे आणि स्वतःला फ्ल्यू सारखी लक्षणे असतील तर तातडीने आरोग्य विभागास अवगत करुन टेस्ट करुन घेणे आणि विलग होणे गरजेचे आहे.
  • जे कोविड रुग्ण घरगुती विलगीकरणात आहेत त्यांनी विलगीकरणाचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. आपल्या घरात पुरेशी जागा नसेल तर घरगुती विलगीकरणाचा आग्रह धरु नये.
  • ज्या व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार, हृदयरोग आणि अशा स्वरुपाचे आजार आहेत आणि ज्यांचे वय ६० पेक्षा अधिक आहे त्यांनी आपला जनसंपर्क कमी करणे आणि लक्षणे असल्यास अजिबात उशीर न करता वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
  • प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णाने आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती आरोग्य विभागाला तातडीने द्यावी. यामुळे या व्यक्तींचा शोध घेऊन आजाराचा प्रसार रोखण्यास मदत होते.