आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आयसीयू बेडच्या कमतरतेचे कारण

काही श्रीमंत लोक आयसीयू बेड अडवतात आणि त्यामुळे आयसीयू बेड कमी पडतात, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये(press conference) त्यांनी हे भाष्य केले आहे.

मुंबई: आयसीसू बेडची(ICU bed) कमतरता का भासते याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे|(rajesh tope) यांनी एक वेगळेच कारण आज स्पष्ट केले आहे. काही श्रीमंत लोक आयसीयू बेड अडवतात आणि त्यामुळे आयसीयू बेड कमी पडतात, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये(press conference) त्यांनी हे भाष्य केले आहे. तसेच चाचण्या(tests) कमी करण्यात आलेल्या नाहीत. कोरोना नियंत्रणासाठी ट्रेसिंगवर भर दिला जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आरोग्यमंत्री पुढे म्हणाले की, काही रुग्ण स्वत:च आयसीयूमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतात. दबाव आणून आयसीयू बेड अडवतात. छोट्या शहरांमध्ये घडणारे हे प्रकार चुकीचे आहेत. आयसीयूचे बेड हे आयसीयूच्या रुग्णांनाच मिळाले पाहिजेत. मात्र दुर्दैवाने खर्च करू शकणारे श्रीमंत लोक आयसीयू बेड अडवून ठेवतात. मग आयसीयू बेडचा कमतरता निर्माण होते. यासाठी आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जागरूक राहून काम करायला हवे. लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना आयसीयू बेड देऊ नयेत, असे टोपे म्हणाले.

चाचण्यांच्या बाबतीतील आरोपावर स्पष्टीकरण देताना टोपे म्हणाले की, चाचण्या कमी झालेल्या नाहीत. ट्रेसिंगवर (tracing)१०० टक्के भर दिला जात आहे. कोरोना नियंत्रणासाठी ट्रेसिंग हा रामबाण उपाय आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कातील २० जणांचे ट्रेसिंग बंधनकारक आहे. जे कमी ट्रेसिंग करत आहेत त्यांना सूचना दिल्या जात आहेत. ट्रेसिंग वाढल्यानंतर टेस्टींग वाढवता येते. त्यानंतर कोरोना रुग्णांना क्वारंटाईन करता येते. उपचार करता येतात.

पुण्यातील पत्रकार पांडूरंग रायकरच्या(journalist pandurang raikar) मृत्यूविषयी टोपे म्हणाले की, आम्ही चौकशी करून माहिती घेऊ. त्यानंतर योग्य निर्णय घेण्यात येईल.